व्हिडिओ न्यूज

कोण दोन नंबरवाला? फोटो काढावा तरी अडचण नाही तरी अडचण- पवार

2017-06-18 17:56:59 Mainvideo, 21680 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): राजकीय नेत्यांसोबत कुणीही फोटो काढतं. नाही म्हणता येत नाही. पुढे अशा फोटोंवरुन अडचण होते. असे अनेक किस्से यापूर्वी घडले आहेत. त्याचाच धागा पकडून परवा लातूर दौर्‍यावर आलेल्या अजित पवार यांनी आपली पंचाईत बोलून दाखवली. राष्ट्रवादी पक्ष सर्वांना आपला वाटला पाहिजे. जनमाणसात चांगली प्रतिमा असणार्‍यांना पक्षात घ्यावे. नाही तर गावात काही ओवाळून टाकलेले असतात. आमच्या जवळ बसून फोटो काढतात. पुढे चर्चा होतात. बघा दोन नंबरवाल्यासोबत फोटो काढला. नाही काढू द्यावा तर म्हणतात बघा सत्तेत गेली तरी यांचा आखडूपणा जात नाही! फोटो काढू द्यावा तरी अडचण नाही काढू द्यावा तरी अडचण अशी आपबिती त्यांनी सांगितली. हे सांगतानाच लूज टॉक करु नका असा सल्लाही त्यांनी दिला.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!