व्हिडिओ न्यूज

अजित पवार म्हणतात, विक्रम जरा आमचंही बघ ना!

2017-06-18 18:41:00 Mainvideo, 19942 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): शिक्षक आमदार विक्रम काळे यांचं कौतुक करीत अजित पवार यांनी त्यांना चांगलंच सुनावलं. विक्रम दर दोन महिन्याला प्रत्येक जिल्ह्याला जाऊन शिक्षकांच्या स्थितीचा आढावा घेतो. आम्हीही ऐकलंय चांगलं चाललंय. तुला शिक्षकच मतदान करतात हे खरंय. पण आम्हीही लोकांना सांगत असतो अरे याला मत द्या, याला मत द्या. जरा आमचंही बघ ना काही तरी. आमच्याही हातात काही तरी आहे. शिक्षकांच्या कामासाठी एखाद्या जिल्ह्याला जाल तेव्हा तिथं कार्यकारिणीची बैठक घेत जा. नाही तर एकदा पदाधिकारी नेमले, गळ्यात गमचा घातला की झाले! त्याला दिलेली जबाबदारी तो पार पाडतोय का याचीही माहिती घ्यावी असंही पवार म्हणाले. परवा ते लातुरात जिल्हा मेळाव्यासाठी आले होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!