व्हिडिओ न्यूज

लातूर खराब शहर, रस्ते वाईट, झाडांचा पत्ता नाही- अजित पवार

18-06-2017 : 07:20:26 Mainvideo, 23648 Views 0 Comments

लातूर खराब शहर, रस्ते वाईट, झाडांचा पत्ता नाही- अजित पवार
लातूर (आलानेप्र): लातूर शहरात आलो. किती खराब शहर आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरात प्रचंड घाण आहे. झाडांचा पत्ता नाही....हे कौतुक केलंय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी. परवा दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. एकेकाळी लातूर पॅटर्नचं किती नाव होतं. सगळा महाराष्ट्र लातुरकडे बघायचा असं ते म्हणाले. लातूर मनपात राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला. नीट पक्षबांधणी केल्यास ही संख्या वाढू शकते. सामाजिक कामांवरही लक्ष द्यावं. शिक्षकांचेही अनेक प्रश्न आहेत. पण शिक्षणमंत्र्यांचं लक्ष नाही. लोकांना सगळं फुकट हवं आहे असं परवा विनोद तावडे म्हणाले होते. शेतकर्‍यांना हमीभाव द्या कर्जमाफीचीही गरज नाही असं पवार म्हणाले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!