व्हिडिओ न्यूज

बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज: तीन आरोपींना २३ पर्यंत कोठडी

2017-06-19 19:20:47 Mainvideo, 11393 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मोबाईलचा वापर करुन अवैधरित्या आंतरराष्ट्रीय कॉलींगचा व्यवसाय करणार्‍या पाचजणांना आजवर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रवी साबदे आणि शंकर बिरादार या दोघांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली होती. या दोघांनी दिलेल्या माहितीवरुन लातुरच्या शामनगर, हैदराबाद आणि सोलापुरात धाडी टाकण्यात आल्या. हैदराबादेतून मोहम्मद अब्दुल फैज, मोहम्मद इब्राहीम आणि सोलापुरातून सुदामन घुले यांना ताब्यात घेण्यात आले. हैदराबादचे दोघेजण या कामासाठी लागणारी मशीन्स आणि तंत्रज्ञान पुरवायचे. तेही हैदराबादेत असाच धंदा करीत होते. त्यांच्याकडूनही दोन मशीन्स जप्त करण्यात आल्या आहेत. हैदराबादचे दोघे आणि सोलापुरचा एक अशा तिघांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लातुरच्या शामनगरच्या धाडीत सीमकार्ड्स आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली. बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालवल्याने टेलीफोन विभागाचे अंदाजे १६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन आणि एटीएसचे एक पथक कार्यरत आहे. शिवाय एटीएस आणि टेलीफोनचे अधिकारी लातुरातच तळ ठोकून आहेत.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!