व्हिडिओ न्यूज

लोकनेते विलासरावांच्या स्मृतीदिनानिमित्त बाजार समितीचे आरोग्य शिबीर

12-08-2017 : 11:05:50 Mainvideo, 28236 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाजार समितीने सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले. याकामी रुरल हेल्थ डेव्हलपमेंट या संस्थेने आरोग्य सेवा पुरवली. हजारोजणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यात बाजार समितीशी निगडीत सर्व घटकांतील व्यक्तींचा समावेश होता. माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. हे शिबीर दोन दिवस चालणार आहे. शिबिरात वैजनाथ शिंदे यांनीही तपासणी करुन घेतली. दीड हजार जणांनी या शिबिरासाठी नोंदणी केली होती. १४ तारखेला या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना रिपोर्ट कार्ड देण्यात येणार आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा, डॉ. अरुण मोरे, उप सभापती मनोज पाटील, डॉ. कांचन मोरे, हणमंतराव शिंदे, बालाप्रसाद बिदादा, संभाजी वायाळ, डॉ. दिनेश नवगिरे, सुधीर गोजमगुंडे, तात्यासाहेब बेद्रे, हर्षवर्धन सवई, डॉ. महेश बागडे, सचिव मधुकर गुंजकर, अजय दुडीले, अजिंक्य सोनवणे, दिलीप पाटील, विक्रम शिंदे, तुकाराम आडे, चंद्रकांत सूर्यवंशी, बलभीम पाटील, बालाजी पवार उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!