व्हिडिओ न्यूज

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी केला सत्यनारायण

2017-08-12 11:25:51 Mainvideo, 28867 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इश्वराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना सदबुद्धी द्यावी आणि बळीराजाला हलाखीच्या परिस्थितीत मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यनारायणाची पूजा घातली. या पूजेच्या कार्यक्रमनाची रितसर निमंत्रण पत्रिका छापून वितरीत करण्यात आली होती.
दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातचा जाण्याच्या स्थितीत आहे. नोटाबंदीच्या काळात सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. गारपीटग्रस्तांना आणि पीक विमा न भरलेल्या शेतकर्‍यांना ५० टक्के नुकसान भरपाई देण्याचेही कबूल करण्यात आले होते पण यातले काहीच झाले नाही. शेतकर्‍यांनी भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी ही पूजा घालण्यात आली. सरकारला सदबुद्धी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आली असे अरुण कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र मोरे, अ‍ॅड. विजय जाधव, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, धर्मराज पाटील, अशोक दहीफळे, बबन चव्हाण, नवनाथ शिंदे, सचिन ढवण उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!