व्हिडिओ न्यूज

स्मार्ट पोलिस ठाणे, आयएसओ मानांकन, पोलिस-जनता समरसता हेच व्हिजन- एसपी राठोड

2017-10-11 21:57:44 Mainvideo, 682 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): ‘माझं लातूर माझं व्हिजन’ या आजलातूरच्या उपक्रमात आज जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी आपलं व्हिजन सांगितलं. शांत जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याचा लौकिक आहे. तो टिकवणे हे तर उद्दिष्ट आहेच, शिवाय पोलिस ठाणी स्मार्ट करणे, पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन प्राप्त करुन देणे हे व्हिजन असल्याचे डॉ. राठोड सांगतात.
आजलातूरने समाजात महत्वाची भूमिका बजावणारे अधिकारी, पदाधिकारी, समाजसेवक, सामाजिक नेते, राजकीय नेते यांच्याशी ‘माझं लातूर माझं व्हिजन’ या उपक्रमांतर्गत संवाद साधणं सुरु केलं आहे. दिवाळीच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात भविष्यात लातुरसाठी काय काय करायचं आहे हे जाणून घेतलं. लातूर जिल्हा शांत आहे. तो तसाच शांत ठेवणे हे एक मोठे आव्हान आणि कौशल्य आहे. लातूर पोलिसांनी आजवर राबवलेल्या सगळ्या योजना आणि उपक्रमांना लातुरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अलिकडेच सुरु केलेल्या बळीराजा सबलीकरणाच्या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील. लातूर पोलिसांनी ‘मनोमिलन’ नावाचा उपक्रम राबवला. एकमेकांपासून दूर झालेल्या पती पत्नींना एकत्र आणण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कैद्यांसाठी ‘परिवर्तन’ कार्यक्रमाचं आयोजन केलं....या सगळ्या बाबी डॉ. राठोड यांनी अतिशय अभिमानाने सांगितल्या. आता सगळ्या शाळातून प्रेझेंटेशनद्वारे कायद्याची माहिती देण्याचा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. विविध खेळांच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, मुशायरा अशा कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. पोलिस ठाण्यात येणार्‍या तक्रारदाराला योग्य आणि चांगली वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, त्याला यशही आले आहे, प्रत्येक पोलिस ठाणे स्मार्ट कसे होईल आणि पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहोत. पोलिस खात्यातील कर्मचारी जनतेच्या तक्रारींचं निराकरण करतात. पण या कर्मचार्‍यांच्याही अडचणी असतात त्या सोडवता याव्यात यासाठी ‘समाधान’ नावाची हेल्पलाईनही सुरु केली आहे. लातुरचा शांततेचा लौकीक कायम राखणे हे महत्वाचे व्हिजन आहे असे डॉ. राठोड यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!