HOME   लातूर न्यूज

मांजरा कारखान्याकडून २२०० ची उचल अदा

सर्वाधिक भाव देण्याची परंपरा यंदाही कायम राखणार


मांजरा कारखान्याकडून २२०० ची उचल अदा

लातूर: विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि, या कारखान्याच्या २०१७-१८ च्या गळीत हंगामात गळीतासाठी येणार्‍या ऊसास रु. २२०० प्रति मेट्रीक टनाप्रमाणे पहिली उचल रक्कम अदा करण्याबाबत कारखान्याचे चेअरमन आ. दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले होते. त्या प्रमाणे या हंगामात १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत गळीत झालेल्या ऊसाला रु. २२०० प्रति मेट्रीक टनाप्रमाणे पहिली उचल संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक बचत खात्यावर १८ नोव्हेंबर २०१७ रोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने दिली आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर साखर कारखान्याचे आता पर्यंत झालेल्या गळीत हंगामात कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास जास्तीत जास्त दर देऊन अनेक वेळा उच्चांक प्रस्थापीत केलेले आहेत. कारखान्याची वाटचाल आ. दिलीपराव देशमुख व आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे चालू असून सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे. त्यामुळे कारखान्यास पुरवठा करणार्‍या ऊस उत्पादकामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून या वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मोठया प्रमाणात ऊस लागवडी होत आहेत.


Comments

Top