रेणापूर: केंद्र व राज्य शासन खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. दिलेल्या आश्वासनांची अमलबजावणीत नाही. राज्यातील शेतकर्यांचे कर्ज माफ व्हायला पाहिजे परंतू संध्या नगण्य कर्ज माफी मिळत आहे. म्हणजे शासनाने ही कर्जमाफी करून शेतकर्याची दिशाभूल केली आहे. अशी टिका शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली. जननायक संघटना शेतकरी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे, असे ते म्हणाले. जननायक संघटने मार्फत रेणापूर तालुक्यातील आनंदवाडी, कुंभारवाडी, रामवाडी, गावात आयोजित जनसंवाद यात्रेत बोलत होते. या यात्रेस लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्याचे स्वागत होत आहे. मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहत आहेत.
या यात्रेस माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संघटनेचे कार्याध्यक्ष निळकंठ पवार, जिल्हा युवा अध्यक्ष प्रा.
मारूती सुर्यवंशी, रेणापुर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, लातूर मनपाच्या माजी सभापती सौ.केशरताई महापूरे, आंनदवाडीचे सरपंच सावित्रिताई सुडे, बाबुराव बुड्डे, सुरेश बुड्डे, गणपतराव बल्लमपट्टे, राम वल्लमपट्टे, निवृत्ती बुट्टे, कुंभारवाडीचे बाणापूरे दयानंद, करमुठे बालाजी, शेवाळे सुग्रीव, संजय कनामे, धर्मराज करमुडे, तुकाराम पोतले, हाणमंत कातपुरे, रक्माजी गोडभरले यांच्यासह लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments