लातूर: कोठडीतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणी मागच्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस प्रशासनाची बदनामी करण्याचे षडयंत्र कांही माध्यमाद्वारे होऊ लागले आहे. कांही दिवसापूर्वी अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणी अशीच बदनामी करण्यात आली होती. वास्तविक पाहता आरोपीच्या मृत्यू प्रकरणी पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी आरोपीचा मृत्यू मारहाणीमुळे झाले नसल्याचे सांगितले असतानाही ही बदनामी सुरुच आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाची होणारी बदनामी तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनासह राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांसह निवदेनाद्वारे पोलिस अधिक्षंकाकडे केली आहे.
लातूर शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुधाकर बावकर हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी यापूर्वी अनेक गुन्हयाचा उकल योग्य पध्दतीने करुन आरोपींना गजाआड केलेले आहे. कांही वेळा तर त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गुन्हेगारांशी दोनहातही केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना पदकानेही सन्मानीत करण्यात आले आहे. मात्र याच एमआयडीसी पोलिस ठाण्यात गत महिन्यात एका आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला असल्याचे कांही माध्यमांद्वारे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता त्या आरोपीचा मृत्यू कोठडीत झालेला नसून रुग्णालयांत उपचारा दरम्यान झालेला आहे. त्याचबरेाबर त्याचा मृत्यू फिनेल पिल्याने झाला असल्याचा खुलासा देऊन यामध्ये पोलिसांनी कोणतीही मारहाण केली नसल्याचे पोलिस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोणत्याही वस्तुस्थितीची माहिती न घेता सांगलीच्या घटनेचा संदर्भ देत कांही वृत्तवाहिन्यांनी पोलिस प्रशासनास बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु केले आहे. त्यामुळे होणारी पोलिसांची बदनामी तात्काळ थांबवून केवळ माध्यमांच्या बातम्यावरुन दोष नसणार्या अधिकार्यांवर कसलीही कारवाई करु नये अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस अधिक्षक डॉ.शिवाजी राठोड यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनावर अॅड. उदय गवारे, भगवान माकणे, अॅड. आयव्ही गोरे, हरिभगत, राजाभाऊ चौगुले, विजय घाडगे पाटील, मनोज डोंगरे, महादेव पवार, महादेव ढमाले, कुलदीप सूर्यवंशी, अॅड. आतिष चिकटे, सुनिल बसपुरे, फुलचंद कावळे, श्रीराम माने, बंटी कसबे आदिंसह शेकडो जणांच्या स्वाक्षर्या आहेत.
Comments