लातूरः लातूर शहर हे सर्वांगीण विकासासह शैक्षणीक पॅटर्न मध्ये नावाजलेले असल्यामुळे आजघडीला शाळा, महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्राच्या पलीकडे ही लातूर शहर व जिल्हाभरात कोचींग क्लासेसचे पीक वाढल्यामूळे आणि त्यातही शैक्षणिक स्पर्धेच्या नावाखाली लातूर शहरा मध्ये कोचींग क्लासेसची स्पर्धा वाढली. त्यामुळे स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची एका स्पर्धकाने बाजारु गुंडाकरवी त्यांची निर्घृण हत्या घडवून आणली. त्यामुळे लातूर शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील शैक्षणीक क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे लातूर शहरातील सामाजीक कार्यकर्ते रघुनाथ बनसोडे यांनी लातूर येथील पत्रकार भवन येथे राजकीय पक्षासह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याची बैठक आयोजीत केलेली होती. त्यानुसार या बैठकीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी उपस्थित राहून या धोरणाच्या संदर्भात १० जुलै रोजीच्या लातूर जिल्हा शैक्षणीक बंदसाठी दुजोरा दिला. तत्पूर्वी उद्याच्या चार जुलै रोजी शैक्षणिक बंदच्या आराखड्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठक आयोजित केल्याचेही सदरील बैठकीत रघुनाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस शेकापचे उदय गवारे, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसंवत अप्पा उबाळे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, बसपाचे सिध्दार्थ सुर्यवंशी, साधू गायकवाड, रुपेश गायकवाड, लष्करे भिमाचे रणधीर सुरवसे, विशाल भोपणीकर, जनहित युवा संघटना चे बाबासाहेब बनसोडे, राजू सुर्यवंशी, महाराष्ट्र एकता संघटनाचे सं.अध्यक्ष गौसोदीन उस्मानसाब शेख, नागनाथ भवानी कांबळे, बाबुराव शेल्लाळै, सुहास सोनकांबळे, यांचेसह अनेकानी आपापले मत प्रदर्शीत केले. यावेळी कॉग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी पाठींबा दर्शवून आगामी अंदोलनात कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतील अशी ग्वाही दिली.
Comments