लातूर: यंदाही तुरीचे पीक बहरले आहे. बहुतांश भागात तुरीला फुलांचा बहर आहे. काही ठिकाणी तर शेंगाही येऊ लागल्या आहेत. बहुतांश ठिकाणची तूर जोमात आहे. मागच्या वर्षी आलेला अनुभव लक्षात घेता यंदा अनेकांनी तुरीचे पीक घेण्याचा मोह टाळला पण ज्यांनी लावली त्यांना मात्र पुन्हा संकटं झेलावी लागणार आहेत. या सोबतच यंदा हरभरा आणि ज्वारीचीही चांगली उगवण झाली आहे. ज्वारीही बहरात आहे. ज्वारीचे उत्पादन कमी घेतले जात असल्याने ज्वारीचा भावाचा प्रश्न सहसा उदभवत नाही. हरभर्यालाही बर्यापैकी भाव मिळतो मात्र तुरीचं काय होणार हा प्रश्न आहे कारण मागच्या वर्षी सरकारने घेतलेली तूर मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्यानं ५५ रुपये भावाने ती रेशनवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
Comments