लातूर: संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयात आलेल्या वारकरी-रुग्णांसाठी विश्वशांती केंद्र, आळंदी व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी मार्गावर २१ व २२ जुलै रोजी मोफत सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात तब्बल १२ हजार १३६ वारकरी रुग्णांना आराम मिळावा यासाठी रोगनिदान करुन औषधे, इंजेक्शन देवून उपचार करण्यात आले.
हे आरोग्य शिबीर माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री रमेशअप्पा कराड, प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या आरोग्य शिबीरात अतिसार, काविळ, टायफाईड, सर्दी, थंडी-ताप, उच्चरक्तदाब, सांधेदुखी, त्वचारोग, मधुमेह आदी आजारांविषयी वारकऱ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करुन औषधे, गोळया मोफत देण्यात आल्या.
या आरोग्य शिबीरात कॅम्प प्रमुख डॉ. प्रमोद मुळे व डॉ. राजेंद्र जाधवर यांच्या नेतृत्वात डॉ. कार्तीक गुप्ता, डॉ. आदित्य महाजन, डॉ. शैलेंद्र सिंग, डॉ. राजेश विरपक्षे, डॉ. आर. एन. कुदमुड, डॉ. एम. सी. भुजंगे, डॉ. साईप्रसाद काचे, डॉ. महेश मदने, डॉ. प्राजक्ता जगताप, डॉ. समृध्दी लाकडे, डॉ. स्नेहल गोटे, फार्मासिस्ट एस. एन. चंद्रपाटले, एस. के. रासुरे, मेट्रन एम. व्ही. हत्ते, परिचारक दत्ता दुधभाते, अजय अकुच, प्रेमकांत पुजारी, सौ. प्राची मुसळे, अक्षय कदम, अक्षय नालटे, टी. के. पठाण, जी. आर. कुलकर्णी, पी. व्ही. जोशी यांनी भक्ती-भावाने वारकरी रुग्णांची सेवा केली.
Comments