लातूर, दि.२८- तालुक्यातील रामेगावच्या शिवारात लातूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर साकारत असलेल्या बौध्द महा विहारच्या उभारणीसाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा नुकतीच केली होती. त्या निधीचे पत्र पुज्य भंते पय्यानंद यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. बौध्द बांधवांच्याच सहकार्यातून लातूर तालुक्यातील रामेगावच्या शिवारात लातूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर बौध्द धम्माचे पर्यटन स्थळ साकारत आहे. हे विहार जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाडा व शेजारील कर्नाटकच्या सीमावर्ती भागात आकर्षक ठरावे, असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी लागेल ती मदत देण्याचे जाहीर केले आहे. याच्या कामास सुरुवात व्हावी, यासाठी त्यांनी महाविहार शुभारंभ कार्यक्रमात २५ लाख रुपयांचा स्थानिक विकास निधी देण्याची घोषणा केली होती. या निधीचे पत्र डॉ. गायकवाड यांनी आज महाविहार समितीचे अध्यक्ष भंते पय्यानंद यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी प्रकाश सुरवसे, मधुकर श्रृंगारे, रामलिंग पटसाळगे, पांडुरंग अंबुलगेकर, हरिभाऊ गायकवाड यांच्यासह विहार समितीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments