HOME   लातूर न्यूज

सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंतांचा २६ नोव्हेंबरला सत्कार

अंजली गायकवाड, नंदीनी गायकवाड, तनुजा शिंदे, चिगरी गुरुजींचा समावेश


सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंतांचा २६ नोव्हेंबरला सत्कार

लातूर: लातूर येथील सामाजिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, क्षेत्रात सलग २९ वर्षांपासून काम करणाऱ्या अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने लातूरच्या मातीशी स्पर्श असलेल्या झी सारेगमप लिटल चॅम्पियन राष्ट्रीय स्पर्धा विजेती अंजली अंगद गायकवाड, झी युवा टीव्ही चॅनल संगीत सम्राट विजेती नंदिनी अंगद गायकवाड, मराठी चित्रपटात ‘छंद प्रीतीचा’ मधील बाल कलाकार तनुजा शिंदे, जेष्ठ संगीत मार्गदर्शक शांताराम चिगरी गुरुजी यांचा २६ नोव्हेंबर रोजी अष्टविनायक मंदिर येथे सायंकाळी ०५ वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष् डॉ अशोक कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, तर माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे महापौर सुरेश पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड, उपमहापौर देविदास काळे यांची उपस्थितती राहाणार आहेत. या सांस्कृतिक सत्कार सोहळ्यास रसिकांनी नागरिकांनी उपस्तीत रहावे असे आवाहन अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, संचालक सुरेंद्र पाठक, अभय शहा, लोया, हरिराम कुलकर्णी, झंवर, शशिकांत देशमुख यांनी केले आहे.


Comments

Top