लातूर: श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा इतिहास विलक्षण आहे. निस्वार्थी भावनेतून मुलांच्या शैक्षणिक सुविधांसाठी अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सुरु झालेल्या या संस्थेने अनेक शाळा काढून मुला-मुलींची शिक्षणाची सोय केली. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आणि शहराच्या जडणघडणीत श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने दिलेले योगदान हे अमूल्य आहे. आगामी काळात या संस्थेला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपदान आमदार अमित देशमुख यांनी केले. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शाळेमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव, शिष्यवृत्ती वितरण व संस्थाभूमिदाता वंशजांचा सत्कार आणि शिलान्यास आनावरण सोहळयाचे आयोजन दयानंद सभागृह येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार अमित विलाराव देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शैलेश लाहोटी यां्नी भूषवले. व्यासपीठावर लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव आशिष बाजपाई, उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, ललीतभाई शहा, ॲड. विक्रम हिप्परकर, सूर्यप्रकाश धूत, बालकिशन बांगड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संस्थाभूमिदातांचे वंशज, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था शतकोत्सवाकडे वाटचाल करत असताना या संस्थेने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे, असे सांगुन आमदार देशमुख पुढे म्हणाले की, संस्थेने विविध शाळांची उभारणी केली. यासोबतच स्विमिंग पुल, अत्याधुनिक क्रीडा संकुल, मुलींसाठी जीमची व्यवस्था केली आहे. संस्थेच्या पुढाकारातून लातूर शहराची शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राचीही भरभराट होत आहे. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा आपल्याला सार्थ आभिमान असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या परिश्रमातून शाळेतील अनेक विद्यार्थी गुणवंत ठरले आहेत. या सर्वांचे कौतूक करुन आमदार अमित देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
लाहोटीच्या भेटीने चंद्रदर्शन
काय घडल, काय बिघडलं याच्या खोलात मी जाणार नाही. मात्र संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी तुमच्या आणि माझ्या एकत्र येण्याने उद्या वर्तमानपत्राची बॅनर लाईन बातमी होणार आहे. शिवाय कितीतरी लोकांची पोटंही दुखणार आहेत अशी मिस्कील टिप्पणी आमदार अमित देशमुख यांनी या कार्यक्रमात बोलताना केली.
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी आमदार अमित देशमुख यांना संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलवल्यामूळे ते या व्यासपीठावरून नेमके काय बोलणार यांचे लातूरकरांना कुतुहल होते. आमदार देशमुख यांनी मात्र आपले संपूर्ण भाषण शैक्षणिक आणि लातूरच्या विकासावर केंद्रित केले होते. उपस्थित लोकांची उत्सुकता लक्षात घेऊन त्यंनी राजकारणाचा ओझरता उल्लेख केला, ते म्हणाले की शैलेश लाहोटी आणि मी खुप जूने सहकारी अहोत नेमके काय घडले काय बिघडले मला ठाऊक नाही. आता त्याच्या खोलात जाणार नाही. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. परंतु शैलेश लाहोटीच्या भेटीने दिवसा चंद्रदर्शन मात्र झाले आहे याचा आपणाला आनंद आहे या आमदार देशमुख यांच्या टिपणीने सभागृहातून उत्स्फुर्त दाद मिळाली.
Comments