लातूर: लातूर तालूक्यातील कव्हा येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधाकर रूकमे यांच्या निवासस्थानी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कव्हा गावातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी लातूर तालूका काँग्रेस अध्यक्ष दगडूसाहेब पडीले, सुधाकर रूकमे, सुंदर पाटील कव्हेकर, बालाजी घार, शेखपाशा शेख, बळीराम चोपडे, गोवर्धन कुटवाडे, अमोल होळकर, लक्ष्मण साखरे, भरत साखरे, बब्रुवान कदम, शेषराव रूकमे, आनंत रूकमे, नवनाथ किनीकर, महेश गुलगुडले, वलीपाशा पठाण, सिकंदर पटेल, असगर पटेल आदिंची उपस्थिती होती.
Comments