लातूर: आजपासून पोस्ट कार्यलयात बॉंकींग सेवा सुरु होते आहे. सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी दोन वाजता विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. असाच कार्यक्रम लातुरातही होतोय. या कार्यक्रमासाठी मुख्य पोस्ट कार्यालयासमोर भला मोठा मंडप टाकला आहे. या योजनेचे उद्घाट्न मोदी करणार आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण केलं जातंय. पोस्टाच्या मंडपात बसलेल्या हजार दोन हजार ‘पोस्ट प्रेमींना’ तो पहायला मिळणार आहे. लातुरचे खा. सुनील गायकवाड या योजनेचं लातुरात उद्घाटन करीत आहेत.
सरकारने अनेक बॅंकांचं विलिनीकरण एसबीआयमध्ये केलं. आता याच बँकेने या बॅंकांना वेगवेगळी नावं देण्याचा निर्णय घेतला. पोस्टात कामाचा मोठा ताण असतो. अनेक शाखात तर दोन तीनच कर्मचारी सगळी कामे करीत असतात. अनेक शाखात एका कर्मचार्यावर वेगवेगळी कामे टाकली जातात. पोस्टमनवरही बॅंकेच्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. पोस्टावर एवढा ताण असताना हा निर्णय का घेतला असावा हे कळणं कठीण आहे. दोन टक्के भत्ता वाढवायचा आणि पन्नास टक्क्याचं काम लादायचं ही गम्मतही कळत नाही.
Comments