लातूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून जिल्ह्यातील शेतकरी, महिला, दलित व गावच्या विकासासाठी प्रचंड मोठे कार्य करता आले. त्यामुळेच जिल्हा परिषद देशात व राज्यात पहिली आली हा जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आहे. याचे मला मनापासून समाधान आहे. अशी प्रतिक्रिया प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी सारोळा ता. रेणापूर येथे जनसंवाद यात्रेद्वारा व्यक्त केले. या जनसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच अंगद जाधव, जननायक संघटनेचे शिवाजीराव पाटील कव्हेकर, जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे, आप्पासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वनिता काळे, केशरबाई महापुरे तसेच गावचे चेअरमन चंद्रकांत गुरफळ, पोलिस पाटील राजाभाऊ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुग्रीव इंगोले, लिंबराज रणखांब, लायक शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.कव्हेकर म्हणाल्या की, महिला व युवकांना सक्षम करण्याचे काम जननायक संघटनेमार्फत केली जात असून जनतेने आपले प्रश्न सोडविण्यासाठी जननायक संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. ही संघटना मजबूत करण्यासाठी एकत्र यावे, संघटन शक्ती ही महत्वाची असून त्याद्वारे रस्त्यावर येउन प्रश्न सोडवावे लागतील तसेच लातूर जि.प.च्या अध्यक्षा असताना शासनाच्या विविध योजना व बजेट खेचून आणून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य केले असे प्रतिपादन लातूर जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. जिल्हयातील ७५०० शेतकर्यांना विहरीसाठी प्रत्येकी ०३ लाख रुपये प्रमाणे एकूण सव्वा दोनशे कोटीचे अनुदान मिळवून दिले, निर्मल ग्रामसाठी ५० कोटीचे बजेट आणले, समाजकल्याणच्या योजना राबवील्या, पाणी टंचाई कमी होण्यासाठी नरेगाच्या मध्यमातून शोष खड्डे घेतले. यासह इतर अनेक विकास कामे करणारी लातूर जिल्हा परिषद देशात
पहिली आल्याने पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ५० लाखाचे बक्षीस मिळाले असेही प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या. हा जनसंवाद यात्रा उपक्रम माकेगाव, गोपाळवाडी आदी गावातही मोठ्या स्वरूपात ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गावातील नागरिकांनी विकास प्रश्न, कृषी समस्या, नागरी अडचणी मांडून त्या सोडविण्याची मागणी माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्याकडे केली.
Comments