HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्हा परिषदेच्या २१ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार जाहीर

सहा शिक्षिका होणार सन्मानित


लातूर जिल्हा परिषदेच्या २१ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार जाहीर

लातूर: शिक्षक दिनाच्यानिमित्ताने लातूर जिल्‍हा परिषद शाळांतील २१ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार घोषित करण्यात आले.या पुरस्‍कारांचे वितरण मान्‍यवरांच्‍या उपस्‍थीतीत लवकरच करण्‍यात येईल अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती रामचंद्र तिरुके यांनी दिली.
प्राथमिक विभागातून बोकनगावचे संजीवकुमार सुवर्णकार, हासेगावचे बालाजी समुखराव, दादगीच्या श्रीमती राजश्री शिंदे, जानापु्रच्या श्रीमती छाया येरमे, थोडगाचे संभाजी कासले, मुसळेवाडीचे अनिरुध्‍द कुलकर्णी, लिंबाळवाडीचे चंद्रशेखर शिरुरे, शेलदराचे मुख्‍याध्‍यापक विठोबा भवाळ, कोनाळीचे शिवाजी टिळे आणि पांढरवाडीचे गोविंद हंद्राळे आदर्श शिक्षक ठरले आहेत.दिव्‍यांग गटातून काटगावचे मुख्‍याध्‍यापक बालाजी चंदे यांना पुरस्‍कार जाहीर झाला आहे.
फत्‍तेपूरचे मुरमे महेबुब मशायकसाब, बामणीचे विवेक होळसंबरे, शिरुर (जा.) च्‍या श्रीमती पुनम पवार, तळेगावच्या श्रीमती जयश्री कानवटे आणि पंढरपूरचे बाळासाहेब कांबळे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्‍यात येणार आहे.
माध्‍यमिक विभागातून लातूरच्या श्रीमती शोभा फुलारी, भादाच्या अनिता खडके, उदगीरचे शेख खॉजा मोईनोद्दीन रुकनोद्दीन, खरोळाचे गणपती गुरमे, नळेगावचे नागनाथ स्‍वामी यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.


Comments

Top