लातूर: निवळी येथील विलास साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रात सभासदांसाठी सेद्रिंय ऊस लागवड योजना राबविण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठक चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करण्यासाठी सभासदांना तांत्रिक सल्ला देऊन सेद्रिंय खत पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय जमिनीत तयार होणारा शेतमाल जैविक भारत या ब्रँड खाली विक्री करण्यासाठी मार्केटींग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. विविध ऊस विकास योजना, सेद्रिंय ऊस लागवड, ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविणे, युनिट-२ येथील शेतकऱ्यांच्या ऊस्गाळपास हमी मिळण्यासाठी ऊस पुरवठा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Comments