लातूर: विशाल विविध कार्यकारी सोसायटीच्या पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी रावसाहेब लकडे तर व्हाईस चेअरमन पदी हनमंत पवार यांची निवड झाली. लकडे आणि पवार यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीने शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला.
आजपर्यंत सोसायटीच्या पदाधिका-यांची निवड बिनविरोधच झाली आहे. त्याच परंपरेला साजेशी ही निवड झाल्याबद्दल विक्रम गोजमगुंडे यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील सहकारी संस्था डबघाईला येत असताना लातूर विशाल कार्यकारी सोसायटी मात्र आजही क्रमांक एक वर आहे.
निवडीनंतर नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांची भेट घेवून आभार व्यक्त केले.
यावेळी दीपक सुळ, संतोष देशमुख, राजाभाऊ मोरे, माधव गंभीरे, विक्रांत गोजमगुंडे, विष्णू खंदाडे, गोविंद डूरे पाटील, फ़ुलचंद धडे, जिजाबाई देवकूळे, सत्यनारायण पाटील, विकास सुळ, सूर्यकांत धायगुडे, नरेश बुये उपस्थित होते.
Comments