HOME   लातूर न्यूज

अशोक गोविंदपूरकर यांनी स्विकारला सभापतीपदाचा कार्यभार

शैलेश गोजमगुंडे यांचे सभापतीपद झाले रद्द


अशोक गोविंदपूरकर यांनी स्विकारला सभापतीपदाचा कार्यभार

लातूर : लातूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाचा पदभार पुन्हा एकदा अशोक गोविंदपूरकर यांनी स्विकारला. औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालिकेच्या सभापती व सदस्यांची निवड रद्दबातल ठरवून पुन्हा निवड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर समितीचे मावळते सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी सभापती पदाचा पदभार स्विकारला. समितीच्या सदस्यांची निवड १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
अशोक गोविंदपूरकर यांचा कार्यकाल संपल्यानंतर जून २०१८ मध्ये भाजपचे नगरसेवक शैलेश गोजमगुंडे यांची सभापतीपदी निवड केली होती.
या निवड प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसच्या दीपक सुळ, विजय साबदे, पुनीत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही निवड बेकायदेशीर असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला होता.


Comments

Top