लातूर: सध्या स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने आरसीएफ कंपनीच्या पुढाकाराने लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शिव छत्रपती मार्केट यार्डात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मार्केट यार्डातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले. केंद्र सरकारने ०१ ते १५ सप्टेंबर असा अभियानाचा कालावधी जाहीर केला आहे.
या स्वच्छता अभियानात आरसीएफचे जिल्हा प्रतिनिधी महेश पाटील, बाजार समितीचे संचालक बालाप्रसाद बिदादा, फर्टीलायझर्स असोसिएशनचे लातूर तालुकाध्यक्ष विठ्ठल तळेकर, आडत असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, खत विक्रेते राजकुमार शिंदे, राजू मद्रेवार, महादेव शिरसाट, बाळू पल्लोड, सिद्राम चाकोते, केदार सोनाळे, संग्राम मद्रेवार, विठ्ठलराव देशमुख, संगमेश्वर सोनाळे आदी सहभागी झाले होते.
Comments