HOME   लातूर न्यूज

सोमवारच्या भारत बंद मध्ये सहभागी व्हा- अमित देशमुख

अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी


सोमवारच्या भारत बंद मध्ये सहभागी व्हा- अमित देशमुख

लातूर : इंधन दरवाढीचा विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या सोमवारच्या भारत बंदमध्ये लातुरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. बंद दरम्यान शासकीय, खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, कोणालाही इजा पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
इंधन दर वाढीची प्रत्येक क्षेत्राला झळ पोहचली आहे. ही अन्यायकारक दर वाढ कमी करण्यासाठी शासनावरील दबाव वाढविण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंद घोषित केले आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देतील अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


Comments

Top