HOME   लातूर न्यूज

पोलिसांची जातीय सलोखा व्हॉलीबॉल स्पर्धा

११ संघ सहभागी, महापौरांच्या हस्ते उदघाटन, रोख बक्षीसे


पोलिसांची जातीय सलोखा व्हॉलीबॉल स्पर्धा

लातूर: लातूर शहर पोलीस उपविभाग व लातूर जिल्हा पासींग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जातीय सलोखा चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. टाऊन हॉल मैदानावर ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे.. या स्पर्धेत एकूण अकरा संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. उदघाटनप्रसंगी उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक शैलेश स्वामी, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, दत्ता सोमवंशी, क्रीडा अधिकारी निलीमा आडसुळ, महेश पाळणे उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महापौर सुरेश पवार म्हणाले की, लातूरचे नागरीक राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यास प्राधान्य देतात. सर्व जाती-धर्म-सांप्रदायाचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. लातूरमध्ये जातीय सलोखा व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करून पोलीस विभागाने खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम केले आहे. खेळ हा खिलाडूवृत्तीचा असतो. यात हार-जीत पेक्षाही खेळणे, जिंकण्याचे प्रयत्न करणे आवश्यक असते. उपमहापौर देविदास काळे यांनीही आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक विक्रम पाटील यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी या स्पधेंच्या आयोजनामागची पार्श्वभूमी सविस्तरपणे विषद केली. आभार प्रदर्शन दत्ता सोमवंशी यांनी केले. या स्पर्धेतील विजेत्यांना ३१ हजार, २१ हजार व ११ हजारांची पारितोषिके दिली जाणार आहेत.


Comments

Top