HOME   लातूर न्यूज

लक्ष्मी अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश-अशोक अग्रवाल

केरळ पुरग्रस्तांना एक लाखाची मदत


लक्ष्मी अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश-अशोक अग्रवाल

लातूर : येथील लक्ष्मी अर्बन बॅंकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा करतानाच केरळ पुरग्रस्तांना एक लाखाची मदत बॅंकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी जाहीर केली.
डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात लक्ष्मी अर्बन बॅंकेची 22 वी सर्वसाधारण वार्षिक सभा चेअरमन अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. त्यावेळी त्यांनी दहा टक्के लाभांशाची व केरळ पुरग्रस्तांच्या मदतीची घोषणा केली. याप्रसंगी मंचावर व्हा. चेअरमन सूर्यप्रकाश धूत, संचालक शिवाप्पा अंकलकोटे, ऍड. धर्मवीर जाधव, लक्ष्मीकांत सोमाणी, शशीकांत मोरलावार, अजित आळंदकर, प्रल्हाद दुडीले, विजय वर्मा, सतीश भोसले, कमलादेवी राठी तज्ज्ञ संचालक किशोर भराडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर आदींची उपस्थिती होती.
लक्ष्मी अर्बन बॅंकेच्या 8 शाखांच्या माध्यमांतून कारभार सुरू आहे. या सर्वच शाखा नफ्यात आहेत. बॅंकेच्या ठेवी 84 कोटीपर्यंत गेल्या आहेत. लवकरच या ठेवी शंभर कोटींवर नेण्यात येतील. शंभरचा आकाश गाठायला वेळ लागणार नाही. बॅंकेने कर्जाची मर्यादा वाढवली आहे. व्यवसायासाठी 1.35 कोटींपर्यंत कर्ज देऊ शकते. एवढेच नव्हे तर उद्योगाला कर्ज देण्याची बॅंकेची क्षमता निर्माण झाल्याचे अशोक अग्रवाल यांनी सांगितले.
प्रारंभी बॅंकेच्या सभासदांना सहकार व बॅंकिंग क्षेत्राविषयी माहिती व प्रशिक्षण संचालक लक्ष्मीकांत सोमाणी यांनी दिले. दीप प्रज्वलानाने सभेस सुरूवात झाली. सभेच्या प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी आठ शाखेतील उत्कृष्ट खातेदार व ठेवीदारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून अहवालातील सर्व विषय सभासदांसमोर मांडले. सभासदांनी या विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन अशोक अग्रवाल यांनी उत्तरे दिली. यावेळी सभासद उत्तमराव मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन सुशील जोशी यांनी केले. व्हा. चेअरमन सूर्यप्रकाश धूत यांनी सभेचा समारोप करताना मनोगत व्यक्त करून आभार मानले


Comments

Top