लातूर: महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळित झालेली महावितरणची ऑनलाईन वीजबील भरणा सेवा बुधवार पासून सुरळीत झाली आहे. या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक किंवा अंतिम देय भरणाची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार असल्याचे माहावितरणे कळविले आहे.
हा तांत्रिक बिघाड ०८ सप्टेंबर २०१८ पासून होता. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरणा करण्यात अडचणी येत होत्या. हा बिघाड दुरुस्त झाल्याने आता ग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in, मोबाईल अॅप व इतर ऑनलाईन सेवाद्वारे वीजबील भरता येणार आहे. सर्व्हर बंदमुळे ग्राहकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Comments