HOME   लातूर न्यूज

रेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार

मुठभरांचे हित जोपासणारे सरकार घालवा- विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील


रेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार

लातूर: शासनाच्या घोषणा जनतेला दिलासा देण्यासाठी असतात. पण विद्यमान केंदसरकार आणि राज्यसरकारच्या घोषणांची लोकांना भिती वाटत आहे. हे शासन दिवसा नाही तर रात्री घोषणा करीत आहे. यामूळे दुसऱ्या दिवशी सामान्य जनतेच्या स्वप्नांचा चक्काकूर होतो. मुठभराचे हित जोपासणारे हे सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर निवाडा, येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाला आडीच हजार रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला व सदर रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमाही केली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दिलीपराव देशमुख यांचा रेणापूर येथे श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणावर दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी शेतकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या अत्यंत देखण्या आणि भव्यदिव्य सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी राज्यंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार बस्वराज पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जि.प.सदस्य धिरज विलासराव देशमुख, रेणाचे चेअरमन आबासाहेब पाटील,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, रेणा साखर कारखान्याचे आबासाहेब पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रसेचे अध्यक्ष मोईज शेख, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस. आर. देशमुख, मांजरा कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैल्य उटगे, शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, व्हा.चेअरम पृथ्वीराज सिरसाठ, व्हा.चेअरमन सर्जेराव मोरे, लक्ष्मण मोरे, दिलीपराव नाडे पाटील, बाजार समिती सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, ॲड.विक्रम हिप्परकर, रेणापूर बाजार समिती सभापती चंद्रचूड चव्हाण, लालासाहेब चव्हाण, बाबासाहेब बंडगर, कल्याण पाटील, प्रविण पाटील, गोविंद बोरोडे, विजय देशमुख, प्रदिप राठोड, मिठाराम राठोड, अहमदपूर तालुकाध्यक्ष गणेश कदम, लातूर तालुकाध्यक्ष दगडुसाहेब पडीले, प्रभाकर बंडगर, जळकोटचे तालुकाध्यक्ष मन्मथ कीडे, जि.प.गटनेते संतोष तिडके, जि.प.सदस्य चंद्रकांत मद्दे, विलासराव देशमुख युवा मंचचे उपाध्यक्ष मारोती पांडे, उदगीर नगरपरिषदेचे गटनेते विक्रांत भोसले, देवणी तालुकाध्यक्ष मल्लीकार्जुन मानकरी, जिल्हा बँकेचे संचालक एनआर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुठभर भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी सहकार मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम राज्य आणि केंद्रातील सरकार करीत आहे. सहकारी साखर कारखानदारी विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु केली असली तरी सहकार चळवळीला बळ देण्याचे मोठे काम विकासरत्न विलासराव देशमुख, माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सहकारात एक आदर्श निर्माण केला आहे. आज सहकार चळवळ संक्रमण अवस्थेत आहे. सरकारला सहकार चळवळ मोडीत काढावयाची आहे. शेतकरी उद्ध्वस्त करायची आहे. सत्तेत आल्यास दिडपट नफा देण्याचे आश्वासन देणाऱ्या फडणवीस सरकारला तुर खरेदी करता आलेली नाही. चुकारे तसेच आहेत. शेतकऱ्यांच्या हाती टोकण आहे. कर्जमाफी नाही, दुधाला भाव नाही, वीजेचे कनेक्शन तोडले जात आहेत या सर्व परिस्थितीच्या निषेधार्थ शेतकरी पहिल्यांदा सपांवर गेला. समाजातील कोणताही घटक सुखी नाही. त्यामुळे आता दळभद्री सरकारला हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी करुन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे सारा महाराष्ट्र पाहतो आहे असे नमूद केले.


Comments

Top