लातूर- येथील श्री शिवछत्रपती ग्रंथालयाच्या वतीने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
मंगळवारी चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे 'नाट्य व चित्रपट क्षेत्रातील संधी ' या तर बुधवारी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे 'स्पर्धेची आव्हाने पेलतांना ' या विषयांवर व्याख्यान होईल.
ग्रंथालयाच्या वतीने १९८९ पासून व्याख्यानमाला आयोजित केली जाते. आत्ता पर्यंत प्राचार्य शिवाजीराव भोसले, सिंधुताई सपकाळ, डॉ. नागनाथ कोतापल्ले , डॉ. जनार्दन वाघमारे आदींसह ६५ वक्त्यांची व्याख्याने झाली आहेत. सायंकाळी पाच वाजता दयानंद सभागृहात होणार्या या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments