लातूर: भारतरत्न सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन भारतात इंजिनियर डे म्हणून मोठया उत्साहाने साजरा केला जातो. लातूरात हॉटेल कार्निवल रिसॉर्ट येथे असोसियेशन ऑफ आर्किटेक्ट अँड सिविल इंजिनियरच्या वतीने इंजिनियर डे साजरा करण्यात आला. असोसियेशन दरवर्षी हा दिवस साजरा करते.
कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणून लातूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त कौस्तुभ दीवेगावकर, दयानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य रवींद्र चव्हाण होते.कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन आणि सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. यावेळी बोलताना आयुक्त दीवेगावकर म्हणाले की इंजिनियर, आर्किटेक्ट यांचे कार्य अद्वितीय असते त्यांचे भारताच्या उभारणीत मोठा वाटा असतो. महापालिका आर्थिक अडचणीवर मात करत कशाप्रकारे काम करते, सिस्टम मधील त्रुटी काय आहेत त्याबद्दल काय केले पाहिजे, बांधकाम परवाना शुल्क, ऑनलाईन परवाना ह्याबद्दल सविस्तर मोकळेपणानं मत मांडले. असोसियेशन ने लातूरच्या विकासासाठी दबाव गट तयार करावा अशी सूचना ही त्यांनी केली. असोसियेशन च्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य रवींद्र चव्हाण बोलताना म्हणाले कीे वाढत्या शहरीकरणामुळे वेगवेगळ्या आकरा समस्या निर्मान होतात त्याचे निराकरण कसे केले पाहिजे आणि ह्या समस्या, समस्या न समजता त्याला संधी समजून कार्य करावे अशी भूमिका मांडली.
असोसियेशन तर्फे दरवर्षी इंजिनियर आर्किटेक्ट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. ह्यावर्षी इंजिनियर अनंत गाडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गाडेच्या कार्याचा थोडक्यात परिचय इंजिनियर सुधीर बिर्ले यांनी दिला. तसेच इंजिनियर योगेश धुत उत्कृष्ट उद्योजक म्हणून पालक मंत्र्यांच्या हस्ते झाला होता. त्यांचा ही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसियेशन चे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी यानी केले. असोसियेशन ची स्थापना, त्याचे उद्देश आणि आतापर्यंत केलेल कार्य तसेच कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश त्यांनी सांगितला.आभार आर्किटेक्ट मंगेश पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसियेशन चे कार्यकारिणी सदस्य - मनोज सूर्यवंशी, राहुल देशपांडे, गौतम साबळे, शेख शफि, महेश नावन्दर, योगेश धुत, विजयसिंह जाधव, रमेश घोलप, बीर्ले सुधीर, रियाज शेख, मंगेश पाटील, पंकज कोटलवार, सुजित मांडे, भागवत बरूरे, मनोज शिंदे.यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, चाकूर, निलंगा येथील प्रक्टिसिण्ग आर्किटेक्ट इंजिनियर, शासकीय खात्यातील महानगर पालिका, टाउन प्लेनिंग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, इंजिनियर, मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments