लातूर-अमृतसर: लिंगायत स्वतंत्र धर्म संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मागणीसाठी महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगणा व तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनास मंगळवारी अमृतसर येथील सुवर्णमंदिर प्रबंधक समिती, शिरोमणी अकाली दल व उपस्थित शीखधर्मीय प्रमुखांनी सुवर्णमंदिर येथील आयोजित सत्कार कार्यक्रमात जाहीर पाठिंबा दिला. सुवर्णमंदिर येथील कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील उस्तुरी विरक्त मठाचे मठाधीपती व लिंगायत धर्म आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक प. पु. कोरनेश्वरआप्पा स्वामीजी यांनी लिंगायत धर्म आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली व या राष्ट्रव्यापी जनआंदोलनास शीख धर्मियांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले असता शीख धर्मीय प्रमुखांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
Comments