HOME   लातूर न्यूज

शैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद


शैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद

लातूर: लहानांपासून थोरापर्यंतच्या उत्साहाला उधाण आणणारा गणेशोत्सव लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या निमित्ताने भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी महापूर, हरंगुळ, वरवटी, गंगापूर, पाखरसांगवी,पेठ चांडेश्‍वर या गावांना भेटी देवून तेथील गणेशभक्तांशी संवाद साधत श्रींची आरती केली.
यंदाच्या गणेशोत्सवात लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी विविध उपक्रम राबवावेत असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले होते. त्या अनुषंगानेच शहर विधानसभा अंतर्गत विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाचे कौतुक करत गणेशभक्तांशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी लातूर शहरासह ग्रामीण भागात भेटी दिल्या. या भेटीच्या वेळी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते श्रींची महाआरती सुध्दा केली.
शहरापासून जवळच असलेल्या महापूर, वरवटी, बोरवटी, हरंगुळ, गंगापूर, वासनगाव, पाखरसांगवी, खाडगाव, पेठ व चांडेश्‍वर या गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शैलेश लाहोटी यांनी भेटी दिल्या. या भेटी दरम्यान लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी दुष्काळमुक्त अभियानात आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच विविध गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या श्रींची महाआरती सुध्दा केली. यावेळी ज्योतीराम चिवडे, शहर जिल्हा सरचिटणीस तुकाराम गोरे, नगरसेवक सुनील मलवाड, देवानंद साळुंके,पप्पू भालेकर, गणेश गोमचाळे, गौरव मदने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top