लातूर : ट्वेन्टी वन अॅग्री प्रा. लि.च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्वेन्टी वन अॅग्री प्रा. लि. व लातूर वृक्षच्या वतीने राजीव गांधी चौक लातूर येथे डॉ.निता मस्के पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सौ.अदिती अमित देशमुख यांना वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. लातूर वृक्ष चळवळीच्या माध्यमातून वृक्षरोपण, वृक्षसंगोपण व पर्यावरण संवर्धन कामात सौ.अदिती अमित देशमुख यांचा सक्रीय सहभाग आहे. लातूर वृक्ष चळवळीच्या मार्गदर्शीका म्हणून त्या कार्यरत आहेत. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लातूरकरांना वृक्षरोपन व वृक्षसंगोपण करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. लातूर जिल्हात सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या कार्यरत आहेत. सेंद्रिय शेतीत पुढाकार घेवून अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. गुरूवार रोजी सौ. अदिती अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वेन्टी वन अॅग्री प्रा. लि. व लातूर वृक्षच्या वतीने डॉ. निता मस्के पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपन करून झाडांना पाणी देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी सौ.अदिती आमित देशमुख यांना सुदृढ आरोग्य व दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी लातूर वृक्ष समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ.ज्योती सुळ, डॉ. निलम जाधव पन्हाळे, डॉ.जागृती खरटमल, इम्रान सय्यद, स्मिता थोरकर, डॉ.श्रृती कोडगी, डॉ.शितल रेड्डी, प्राचार्य बालाजी वाकुरे, संगीता मोळवने, डॉ. भास्कर बोरगावकर, रितेश बिसेन, डॉ. अरविंद भातांब्रो, राहुल लोंढे, ओमप्रकाश झुरूळे, सोनु डगवाले, विशाल जाधव, राजश्री कांबळे, अमरीन शेख, वैष्णवी सुर्यवंशी, अशिया शेख, सुषमा मुद्दे, शुभम दुधाळे, किशोर बुरांडे आदींची उपस्थिती होती.
Comments