लातूर: शहर महानगपालिकेच्या अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जयनगर वस्ती स्तर संघातर्फे जयनगर, डॉ. झाकीर हुसेननगर येथे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण परिसर बचत गटांच्या महिलांमार्फत स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लातूर शहरामध्ये महिला बचत गटांना घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जयनगर वस्ती स्तर संघाच्या वतीने सदरील परिसरामध्ये दोन दिवस स्वच्छता विषयक विशेष उपक्रम राबविण्यात आला त्यामध्ये तेथील परिसरातील सुप्रिया महिला बचत गट, सरस्वती महिला बचत गट, रोशनी महिला बचत गट, गौरवी महिला बचत गट, प्रतिक्षा महिला बचत गट, राणी महिला बचत गट, धरती महिला बचत गट, मारोती महिला बचत गट, तुळजाभवानी महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, प्रेरणा महिला बचत गट आदी गटातील महिलांनी सहभाग नोंदविला. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाविषयक माहिती देण्यात आली. यामध्ये सुका व ओला कचरा वेगवेगळा करून घंटागा्डीकडे जमा करण्यात यावे याविषयी परिसरातील रहिवाशांना आवाहन करण्यात आले. हा कार्यक्रम आयुक्त अच्युत हंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, समीर मुलाणी, नितीन सुरवसे, समुदाय संघटक शिवलिंग कांबळे, सचिन पांचाळ, जयनगर वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा अख्तरबी कुरेशी, सचिव बायमाबाई गायकवाड, नागीन सरवदे, विजयमाला कांबळे, पद्मीन कांबळे, फातेमा कुरेशी, शाहीन शेख, प्रियंका काळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी या स्वच्छता मोहीमेत १०० हून अधिक महिलांचा सहभाग होता.
Comments