HOME   लातूर न्यूज

वीज प्रश्‍न मार्गी लावू मुख्य अभियंत्याचे आश्वासन

जनसंवाद यात्रेतून शेतकर्‍यांचे प्रश्न कव्हेकरांनी मांडले महावितरणकडे


वीज प्रश्‍न मार्गी लावू मुख्य अभियंत्याचे आश्वासन

लातूर: माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची रेणापूर तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरु असून आजवर ३० गावात झालेल्या बैठकीत प्रत्येक गावातील शेतकर्‍यांनी विजेची अडचण मांडली. हा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कव्हेकर यांच्याकडे शेतकर्‍यांनी निवेदने देउन आग्रही मागणी केल्यामुळे कव्हेकर यांनी जननायक संघटनेच्या एका शिष्ट मंडळासमवेत महावितरण वीज परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड यांची भेट घेतली. हा प्रश्‍न संघटनेच्या वतीने मांडला. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी, सर्व शेतकर्‍यांच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसात गावनिहाय सर्वे करुन गावातील सरपंच, शेतकरी, वीज मंडळाचे आधिकारी व कर्मचार्‍यांची तातडीची बैठक रेणापूर येथे बोलावली जाईल असे बुरुड यांनी संगितले. या शिष्टमंडळात जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, अप्पासाहेब पाटील, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एसआर मोरे, संघटनेच्या महिला संघटक केशरबाई महापूरे, राजाभाउ मुळे यांचा सहभाग होता.
जननायक संघटनेच्या वतीने रेणापूर तालूक्यातील सन २०१४-१६ या दुष्काळी काळातील वीज बिले व त्यावरील व्याज व दंड माफ करावे, थकीत मुद्दल बिलाचे हप्‍ते पाडून ७५ टक्के वीज बिल माफ करुन २५ टक्के भरणा करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ द्यावा, वीज पंपाचा वापर नसताना आलेली जादा विज बिले चौकशी करुन पूर्ण माफ करावीत, भ्रष्ट व कामचुकार वीज कर्मचार्‍यांना निलंबित करावे, मागच्या दोन वर्षापासून रखडलेले माकेगाव (कोष्टगाव) चे ३३ केव्ही सबस्टेशन त्वरित चालू करावे, तालुक्यातील गावनिहाय शेतकर्‍यांचा विजेचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी कव्हेकरांनी लावून धरली.


Comments

Top