लातूर- महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत उज्वल व सक्षम समाज निर्माणासाठी संकल्प करावा. गणरायाकडून या संकल्पासाठी आपल्याला याची शक्ती निश्चित मिळणार. त्यासाठी महिलांचे संघटन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रेरणा होनराव यांनी केले.
येथील बार्शी रोडवरील कैलास नगरमधील गणेशाच्या आरती सोहळ्याच्यावेळी त्या बोलत होत्या.
सर्व सामान्य कुटुंबातील महिलांनी सक्षम समाज निर्मितीसाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. महिलांनी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कर्तृव्याचीही जबाबदारी पार पाडली पाहिजे असे त्यांनी सांगितले. सरकारबद्दल विविध माध्यमातून प्रकट केल्या जाणार्या अर्धवट माहितीच्या आधारे आपण राजकारण व सरकारला चुकीचे ठरवून त्यांच्या पासून चार हात लांब राहण्यात समाधान मानतो पण ही व्यवस्था स्वच्छ आणि सदृढ करण्यासाठी आपण सर्व महिलांनी एकजुटीने एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहनही त्यांनी प्रा. प्रेरणा होनराव यांनी केले.
या कार्यक्रमास दीपा चंदन पुरी, वैष्णवी पोतदार, अनिता मिटकरी, बबिता देवणे, रेणुका गजभरकर, पपिता रावळे, अरुणा रावणकोळे, सुमन नाळापुरे, जान्हवी स्वामी, सुशीला किसवे, मिनाक्षी येरनाळे, वनिता वाघमारे, श्रीनिवास मिटकरी, मनोज रावळे, मनोज मिटकरी, संगमेश्वर रावळे, कपील वाघमारे, वैभव वाघमारे, नारायण नाळापुरे, नागेश रावणकोळे, शुभम चव्हाण, विशाल पुरी, दीपक येरनाळे, पद्माकर केदासे, हरिभाऊ वाघमारे, अजय गोवर्धन, गणेश काकडे, रमेश रावळे, विनायक पोतदार आदी उपस्थित होते.
Comments