लातूर: तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या परिसरात घडली आहे. गणपती विसर्जन मिरवका पाहण्यासाठी लातूर सर्वोपचार रुग्नालयात वास्तव्यास असलेल्या समर्थ महादेव देवके नामक मुलास चार कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ल केला. त्याच्या सहरिरावर डोळ्यापान पायापर्यंत अनेक ठिकाणी चावे घेतले. समर्थ हा काल त्याच्या नातेवाईकासोबत मिरवणूक पाहण्यासाठी त्याच्या आजोबाच्या घरातून बाहेर पडला असता त्याच्या अंगावर सर्वोपचार परिसरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात समर्थ जबर जखमी झाला आहे. त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे लस उपलब्ध नसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते. समर्थचे आजोबा चंद्रकांत बेकरे हे शासकीय रुग्नालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहेत. आजोबा सोबत कॉर्टरमध्ये समर्थ राहतो. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा आणि डुकरांचा रुग्णासआण्भि त्यांच्या नातेवाईकास सतत धोका जानवतो. प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Comments