HOME   लातूर न्यूज

विलास को-ऑपेटिव्ह बॅंक सामान्यांची पत वाढविणार - अमित देशमुख

नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्यांना सवलत देणार


विलास को-ऑपेटिव्ह बॅंक  सामान्यांची पत वाढविणार - अमित देशमुख

लातूर- सामान्य माणूस व्यवसायिक, उद्योजक बनला पाहिजे त्यांच्या शेतीचे आधुनिकीकरण झाले पाहिजे यातून त्‍यांची आर्थिक आणि सामाजिक पत वाढायला हवी. या दृष्टीने विलास को.ऑपरेटिव्ह बॅकेची भविष्यातील वाटचाल राहील अशी ग्वाही अमित देशमुख यांनी दिली. बॅकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्यांना सवलत देवून त्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम बॅंक करणार असल्याचे ते म्हणाले.
विलासराव देशमुख यांची प्रेरणा घेवून स्थापन झालेल्या या बॅकेतून त्याचा उददेश सफल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असून ते पुढेही होत राहणार असल्याचे देशमुख म्हणाले. राष्ट्रीय बॅकेत ज्यांना सहकार्य मिळत नाही अशा सर्व स्तरातील माणसांना स्वालंबी, यशस्वी उद्योजक, व्यापारी बनविण्याचे काम विकास बॅकेतून होत आहे. ग्राहकांची पत पाहून नव्हे तर त्यांचे कर्तत्व आणि होतकरूपणा पाहून ही बॅक कर्ज देणारअसल्याचेही देशमुख म्हणाले.
कमीत कमी वेळ आणि कागदपत्रे पाहून कर्ज मिळवून देण्याच्या सूचना संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले. सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी सुविधा देवून बॅकेचा विस्तार केला जाणार आहे. महिलांना सहज कर्ज उपलब्ध करून देवून महिला उदयोजक बनविण्यासाठी बॅंक पुढाकार घेणार असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर महानगरपालिकेचे सदस्य अशोक गोविंदपूरकर, उ.कृ.उ.बा.समितीचे सभापती ललितभाई शहा, लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख, ज्येष्ठ विधितज्ज्ञ अ‍ॅड.विक्रम हिप्परकर, ट्वेन्टीवन शुगर्स लि. चे समन्वयक विजय देशमुख, उ.कृ.उ.बा.समितीचे उपसभापती मनोज पाटील, बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, संचालक सूर्यकांत कातळे, डॉ.अशोक पोतदार, डॉ. जयदेवी कोळगे, पंडीत कावळे, प्रविण घोटाळे, सुरेश धानुरे, ख्वाजाबानू अन्सारी, अ‍ॅड. किरण जाधव, नेताजी बादाडे, अरुण कामदार, सुनील पडीले, व्यंकटेश पुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी के.जी.गहीरवाल उपस्थित होते.


Comments

Top