HOME   लातूर न्यूज

स्त्री रुग्णालयाला रमाई आंबेडकरांचे नाव द्या

सभेत मंजुरी पण काम होईना, १५ दिवसात विशेष सभा बोलवा-विक्रांत गोजमगुंडे


लातूर: त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव लातूर मधील लेबर कॉलनी येथील मनपा स्त्री रुग्णालयाला देण्यात यावे यासाठी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर महानगरपालिकेत मागणी केली होती. सगळ्या विषयांना मनपा सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येते. परंतु त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या नावाला दूर केलं जात आहे व त्यावर साधी चर्चा देखील होत नाही ही भावना सर्व आंबेडकरवादी विचारांच्या नागरीकांची झालेली आहे. ही मागणी कोण्या एका व्यक्तीची नाही तर तमाम समाजाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वांची आहे. यामुळे ही मागणी डावलण्याचे काहीही कारण नसताना मनपातील मागील सहा महिन्यांपासून सत्ताधारी याबाबत टाळाटाळ करीत आहेत. ही मागणी मान्य व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्व संघटना, पक्षाची मंडळी उपस्थित होती. या मागणी आणि आंदोलनाची दखल घेत येत्या १५ दिवसांमध्ये महानगरपालिकेची ‍विषेश सभा बोलावून ही मागणी तात्काळ मान्य करावी अन्यथा पुढील काळात या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला. या एकदिवसीय धरणे आंदोलनात प्रथमच लातुरातील आंबेडकरवादी विचारांचे सर्व नेते कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सर्व पक्ष, संघटनांची संख्या सर्वाधिक होती. आंदोलनानंतर महापौर यांना निवेदन देण्यास गेले असता महापौर उपस्थित नसल्याने निवेदन त्यांच्या कक्षाच्या दारास डकविण्यात आले व उपायुक्त यांना त्याची प्रत देण्यात आली. निवेदनावर उपस्थितांच्या व शेकडो नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.


Comments

Top