HOME   लातूर न्यूज

तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना एक लाख मंजूर


तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना एक लाख मंजूर


लातूर: जिल्हास्तरीय समितीकडे शेतकरी आत्महत्याबाबतच्या तीन प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजूरी प्रदान केली.
ऑगस्ट २०१ मध्ये शेतकरी आत्महत्या केलेल्या प्रकरणांची तपासणी जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात आली. यावेळी सादर केलेल्या तीन्ही प्रकरणांत संबंधीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय नियमाप्रमाणे मदत मंजूर करण्यात आली. मुलकी ता. अहमदपूर, किल्लारी ता. औसा व खरोळा ता. रेणापूर येथील प्रकरणे होती. किल्लारी ता. औसा येथील प्रकरणातील मयत शेतकरी भागवत गुरव यांच्या तिन्ही मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च प्रशासनामार्फत करण्यात येईल. मुलांना जे शैक्षणिक साहित्य, शुल्क आदिंची आवश्यकता असेल त्याप्रमाणे प्रशासनाकडे मागणी केल्यास त्याचा तात्काळ पुरवठा करण्यात येऊन या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण मिळण्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घेतली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून या मुलांनी व मुलांचे पालक (मामा) यांनी ही निश्चित रहावे, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात मयत शेतकरी गुरव यांनी आत्महत्या केल्यानंतर लगेच त्यांच्या पत्नीने ही आत्महत्या केल्याने हे तिन्ही मुले (एक मुलगा, दोन मुली) पूर्णपणे उघडयावर आलेली आहेत. सध्या ती त्यांच्या मामाकडे राहत आहेत व मामाची ही परिस्थिती बेताचीच असल्याने प्रशासनामार्फत मुलांच्या मामाला हॉटेल व्यवसाय करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहेत.
बळीराजा सबळीकरण
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना / वारसांना बळीराजा सबळीकरण योजनेंतर्गत सन 2014-15,2015-16 व सन 2016-17 या तीन वर्षात 116 मयत शेतकऱ्यांच्या वारसांना 58 लाख रुपयांचे र्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत गाय,म्हैस, मळणी यंत्र, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, विदयुत मोटार, शेळीपालन या व्यवसाय अथवा साहित्य खरेदीसाठी प्रती कुटुंब, वारस यांना प्रत्येकी 50 हजाराचे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा कृषि विकास अधिकारी भिमराव रणदिवे, पोलीस उप अधिक्षक मधुकर जवळकर, तहसिलदार रुपाली चौगुले आदि उपस्थित होते.


Comments

Top