HOME   लातूर न्यूज

महिलांनी कुटूंबा बरोबरच समाज सक्षम बनवावा-प्रा. प्रेरणा होनराव


महिलांनी कुटूंबा बरोबरच समाज सक्षम बनवावा-प्रा. प्रेरणा होनराव

लातूर: महिलांनी कौटूंबिक जबाबदारी सांभाळत सांभाळत एका उज्वल व सक्षम समाज निर्माणासाठी संकल्प करावा. गणरायाकडून या संकल्प पुर्ततेसाठी आपल्याला याची शक्ती निश्‍चित मिळणार आहे. त्यासाठी केवळ ईच्छा शक्ती आपण महिलांचे संघटन होणे गरजेचे आहे. सर्व सामान्य कुटूंबातील महिलांनी केवळ राजकाणाला नावे ठेवून ते क्षेत्र बदनाम करत राहण्यापेक्षा त्यात आपलाही सहभाग नोंदवून एक सक्षम समाज निर्मितीसाठी पुढे यावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रेरणा होनराव यांनी केले.
शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी लातूरच्या बार्शी रोडवरील कैलास नगरमध्ये संपन्न झालेल्या गणेशाच्या आरती सोहळ्या प्रसंगी उपस्थित महिलांना त्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी उपस्थित महिलांना गणेशोत्सवाची माहिती सांगताना त्या म्हणाल्या की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी तत्कालिन पारतंत्र्यातून देशाला मुक्त करण्यासाठी जनमानसाला सांस्कृतीक समन्वयातून संघटीत करण्यासाठी पुण्यनगरीतून या उत्सवाला १९ व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे १८९३ साली गणेशोत्सवाची सुरूवात केली. आज या गणेशोत्सवांनी खर्‍या अर्थाने खुप मोठ्या प्रमाणात व्यापकता प्राप्त केलेली आहे. या माध्यमातून महिलांनी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसारीक हातगाडा हाकताना सामाजिक कर्तृव्याची सुध्दा जबाबदारी समाजकारणातून पार पाडली पाहिजे. सरकारबद्दल विविध माध्यमातून प्रकट केल्या जाणार्‍या अर्धवट माहितीच्या आधारे आपण राजकारण व सरकारला चुकीचे ठरवून त्यांच्या पासून चार हात लांब राहण्यात समाधान मानतो पण ही व्यवस्था स्वच्छ आणि सदृढ करण्यासाठी आपण सर्व महिलांनी एकजुटीने एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी कैलास नगर येथील गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महापुजेची आरती संपन्न झाली. यावेळी लातूरच्या बार्शी रोडवरील बिडवे इंजिनीअरींग कॉलेजच्या पाठिमागील कैलास नगरमधील तसेच गोविंद परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कैलास नगर येथील शिवालय महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपा चंदन पुरी, उपाध्यक्ष वैष्णवी विनायक पोतदार, सचिव अनिता प्रभुअप्पा मिटकरी, बबिता रमेश देवणे, रेणूका गजभरकर, पपिता रमेश रावळे, अरुणा शंकरप्पा रावणकोळे, सुमन विश्‍वनाथ नाळापुरे, जान्हवी महादेव स्वामी, सुशिलाबाई सुभाष किसवे, मिनाक्षी शिवाजी येरनाळे, सौ. वनिता हरिभाऊ वाघमारे, सौ. सुरकूटे आदी महिलांसह गणेश मंडळाचे श्रीनिवास मिटकरी, मनोज रावळे, मनोज मिटकरी, संगमेश्‍वर रावळे, कपिल वाघमारे, वैभव वाघमारे, नारायण नाळापुरे, नागेश रावणकोळे, शुभम चव्हाण, विशाल पुरी, दिपक येरनाळे, पद्माकर केदासे, हरिभाऊ वाघमारे, अजय गोवर्धन, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश काकडे, रमेश रावळे, विनायक पोतदार आदींची उपस्थिती होती.


Comments

Top