लातूर: बलात्कारपिडीत अल्पवयीन मुलीचा गर्भपात करुन आरोपीला सहकर्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी देवणीचे पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांना निलंबित करण्यात आले. ऊसतोड कामगाराच्या मुलीला अरुण राठोड आणि ट्रकचालक सुरेश पवार यांनी फूस लावून पळवून नेले, तिच्यावर महिनाभर अत्याचार केले. ही मुलगी आजीला फोन करुन पळून येण्याचा प्रयत्न करीत होती. तिला पोलिसांनी प्रतिसाद दिला नव्हता. अखेर तिच्या पालकांनीच तिला परळीतून आणले आणि पोलिस ठाणे गाठले होते. पोटात दुखू लागल्याची तक्रार मुलेने केल्याने तपासणी केली असता तिच्या पोटात गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब पोलिसांना समजली. पोलिस निरीक्षक पाटील यांनी सरकारी रुग्णालयात तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. तेव्हा त्यांनी तिला धमक्या देत गोळ्या खाण्यास सांगितल्या. अखेर त्या मुलीचा गर्भपात झाला. ही बाब पिडीतेनं न्यायालयात सांगितली. यावरुन या प्रकरणाच्या चौकशीसाठी डीवायएसपी प्रिया पाटील यांची नेमणूक करण्यात आली. प्रिया पाटील यांनी प्रकरणाची चौकशी करून पोलिस निरीक्षकाविरोधात अहवाल दिला. त्याआधारे पोलिस निरीक्षक पाटील यांना निलंबित केले. त्याचबरोबर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणे, गर्भपात करून बलात्काराचे पुरावे नष्ट करणे या अनुषंगाने प्रकरणात निरीक्षकालाही सह आरोपी करण्याची शिफारस आहे. पीआय पाटील यांनी बलात्काराची तक्रार येऊनही याबाबतची कलमे आरोपींवर लावली नव्हती.
Comments