लातूर: जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. पाऊस पडावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने झाडांना जलाभिषेक करून साकडे घालण्यात आले.
झाडे असतील तर पाऊस पडेल हा निसर्गाचा नियम. जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पडावा यासाठी क्रीडा संकुल येथे वृक्षास अभिषेक करून हे वृक्षराजा लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पाड असे साकडे घालण्यात आले. याच बरोबर झाडे लावू, झाडे जगवू अशी शपथ देखील युवकांनी घेतली. या कार्यक्रमास वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, श्रीधर शिरूरे, रणजितसिंग तिवारी, उमाकांत मुंडलिक, अमोल स्वामी, अमोल दैठणकर, क्षितीज बनसोडे, निखील गाडेकर, अभिषेक कोरे, रोहित सावंत उपस्थित होते.
Comments