लातूर: १९९३ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विनाशकारी भूकंप झाला. त्याचा मोठा फटका या दोन जिल्ह्यातील ५२ गावांना विशेषत: किल्लारीला बसला. या नेसर्गिक संकटात सरकारी आकड्यानुसार ८५०० जणांचा बळी गेला. अनधिकृत माहितीनुसार साडे दहा हजारांहून अधिक जण दगावले. ही घटना घडली तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी तातडीने धाव घेत पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला.
या भागातील बहुतांश घरे दगडमातीची होती. त्यामुळे ती कोसळायला वेळ लागला नाही. याच बांधकामाने अनेकांचे घात केले. आता किल्लारी गाव नवीन वसवले गेले. गाव वसले खरे पण गावांच्या वस्तीतला सांस्कृतिक वारसा हरवला. शहरी पद्धतीने वन बेडरुम वन किचन, काही ठिकाणी टू बेडरुम, हॉल, किचन अशी घरं उभारली गेली. ती वाटप करताना परंपरेप्रमाणे वाटप झाले नाही. हा सांस्कृतिक आणि पारंपारीक वारसा मात्र जपला गेला नाही. समाज व्यवस्थेप्रमाणं गल्ल्यांची रचना झाली नाही. पण या निमित्तानं समाजाभिसरणही झाले. या २५ वर्षात मोठी प्रगती झाली. अनाथांना हक्कांचा आधार मिळाला, महिलांना प्रशिक्षणं मिळाली, तरुणींना वेगवेगळी प्रशिक्षणं मिळाली. ही ५२ गावे आज ताठ मानेने उभी आहेत.
Comments