लातूर: लातूर शहर पोलीस उपविभाग व लातूर पासींग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली जातीय सलोखा चषक व्हॉलीबॉलस्पर्धा लातूरच्या फ्रेंड्स क्लबने जिंकली. या स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र क्लब लातूर आणि फ्रेंड्स क्लब लातूर यांच्यात झाला. त्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात फ्रेंड्स क्लब लातूरने अजिंक्यपद पटकावले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, लातूरचे तहसीलदार संजय वारकड यांसह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धा लातूरच्या टाऊन हॉल मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत फ्रेंड्स क्लब लातूर सह अमन क्रीडा मंडळ, शिराढोण, पॉप्युलर क्रीडा मंडळ, औसा, उदयगिरी क्रीडा मंडळ, महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अ व ब असे दोन संघ, लातूर पोलीस संघ, जयभवानी क्रीडा मंडळ लातूर, मराठवाडा क्रीडा मंडळ, मुरुड, अहमदनगर येथील नगर आर्मी संघ, एमआयडीसी मित्रमंडळ, व अशोका आंतरराष्ट्रीय खेळाडू या संघांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा अंतिम सामना या स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र क्लब लातूर आणि फ्रेंड्स क्लब लातूर यांच्यात झाला.अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना फ्रेंड्स क्लबने २५ - २३ गुणांनी जिंकला. या स्पर्धा बाद व साखळी पद्धतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विक्रम पाटील, लिंबराज बिडवे, महेश पाळणे, प्रवीण तावशीकर, रियाज शेख, मुजीब सय्यद, सतीश नाडे, विजय सोनवणे, मिलिंद टिळक यांनी काम पाहिले. लातूर जिल्हा पासिंग संघटनेचे सचिव दत्ता सोमवंशी व त्यांच्या सहकार्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मनपा आयुक्त अच्युत हांगे यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. पत्रकार महेंद्र जोंधळे यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता सोमवंशी यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार व ११ हजारांची पारितोषिके देण्यात आली.
Comments