HOME   लातूर न्यूज

रेल्वे सल्लागार समितीवर निजाम शेख यांची फेर निवड

मराठवाड्यातून या समितीवर निवड झालेले निजाम शेख हे एकमेव व्यक्ती


रेल्वे सल्लागार समितीवर निजाम शेख यांची फेर निवड

लातूर: मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील रहिवासी, पत्रकार निजाम शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. निजाम शेख हे यापुर्वीही या समितीवर कार्यरत होते. नुकत्याच संपत असलेल्या कार्यकाळातील कार्य पाहून रेल्वे मंत्र्यांनी त्यांची फेरनिवड केली. मध्य रेल्वेच्या या विभागात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही भागाचा समावेश आहे. रेल्वे महाप्रबंधक या समितीचे अध्यक्ष तर उपमहाप्रबंधक सदस्य सचिव असतात. विविध भागातील खासदारांचा सदस्य म्हणून समावेश असतो. रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी या सदस्यांनी सूचना करावयाच्या असतात. याची दाखल घेऊन त्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रयत्न करते. मराठवाड्यातून या समितीवर निवड झालेले निजाम शेख हे एकमेव व्यक्ती आहेत. स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या शिफारशीवरून पहिल्या वेळी निजाम शेख यांची या समितीवर निवड झाली होती. रेल्वे सल्लागार समितीवर निवड केल्याबद्दल निजाम शेख यानी रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे पाटील, लातुरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्र शर्मा, खा. डॉ प्रीतमताई मुंडे, खा. सुनील गायकवाड, भाजपा नेते रमेश कराड, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, उप महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांचे आभार मानले आहेत. ऱेल्वे सल्लागार समितीच्या माध्यमातून प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले.


Comments

Top