लातूर: वाचन संस्कृती प्रभावी, गतिमान आणि कालसुसंगत होण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथ संचालनालय, लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने लातूरच्या दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात २८ व २९ नोव्हेंबर १७ रोजी आयोजित लातूर ग्रंथोत्सव २०१७ च्या निमित्ताने, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, विविध विषयांवरील परिसंवाद आणि समोराप सत्र असे भरगच्च कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी दिली.
या दोन दिवसाच्या ग्रंथोत्सवाच्या सहा सत्राची रुपरेखा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी दिली. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिल्या सत्रात सकाळी ०९ वाजता ग्रंथोत्सवाचे लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी महापौर सुरेश पवार व साहित्यिक प्रा. डॉ. भास्कर बडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ११ वाजता डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली, खा. डॉ. सुंनील गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील मुरुमकर, आ. अमित देशमुख, आ. विनायकराव पाटील, आ. त्र्यंबक भिसे, आ.सुधाकर भालेराव, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मराठवाडा विभाग-लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर हे लाभणार आहेत.
Comments