चाकूर, ता.८ : चाकूर तालुक्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आदर्श व्यक्तींचा 'नेशन बिल्डर आवार्ड' देऊन शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार (ता.७) रोजी गौरवण्यात आले. यावेळी कृषि व्यवसाय व व्यवस्थापन संस्थेचे प्राचार्य डॉ.अमोल देठे, संपादक प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, शैलेश पाटील चाकूरकर, उपप्रांतपाल माधव वलसे, चेअरमन विठ्ठलराव माकणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
कृषी, व्यापार, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल जेष्ठ विधीज्ञ अँड.डी.टी.पाटील, डाल
डॉ.शिवानंद बिराजदार, डॉ.शांतीलाल सोनी, सरपंच गोविंदराव माकणे, संगमेश्वर जनगावे, प्रा.अ.ना.शिंदे, सुधाकर हेमनर, किशोर पाटील, शिवाजी भातके, जयश्री मद्रेवार, श्रीराम वाघमारे, दिनकर पाटील, बिस्मीलाबी शेख, लक्ष्मण बेल्लाळे, संतोष गोरे, काशीम शेख, राजकुमार कदम, प्रा.दयानंद झांबरे, सुरेश मुंढे, प्रभावती पोतणे, लक्ष्मीबाई तेलंगे, नंदा नरहरे, मधुकर कांबळे, प्राचार्य इसाबेग मंगरूळे, प्रा.राजेश तगडपल्लेवार, संतोष भेटे, ओमप्रकाश लोया, खुदबोदीन कुलकुले यांना सन्मानित करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष डाॅ.एन.जी.मिर्झा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, प्रा.राजेश तगडपल्लेवार यांनी सुत्रसंचालन तर सचिव नारायण बेजगमवार यांनी आभार मानले. यावेळी नरेश पाटील चाकूरकर, संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर चाकूरकर, प्रोजेक्ट चेअरमन शिवदर्शन स्वामी, प्रकाश तेलंग, अँड.श्रीधर सोनटक्के, सुरज शेटे, बाबुराव नाकाडे, मनोज सोनटक्के, सागर होळदांडगे यांच्यासह रोटरीयन, नागरिक, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments