लातूर: राज्यात, केंद्रात आणि लात्रातही भाजपचा ढिसाकारभार सुरु आहे, या कारभाराला जनता वैतागली आएह, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात बोलताना धीरज देशमुख म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमूळे देशाची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचा विकास त्यांना मिळायलाच हवा. भाजपाच्या जुलमी राजवटीला देश कंटाळला असून २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशातील जनता निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाहेर फेकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सहकारी साखर कारखाना संचालक रवींद्र काळे यांनी केले तर आभार उपसरपंच राजाभाऊ काळे यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमास विक्रम हिप्परकर, जिल्हा बॅंकेचे संचालक नाथसिंह देशमुख, विलास साखर माजी संचालक बळवंतराव काळे, ट्वेन्टीवन शुगर्सचे समन्वयक विजय देशमुख, विलास साखर उपाध्यक्ष गोविंद बोराडे, पंचायत समिती सभापती सौ. शितल फुटाणे उपस्थित होते.
Comments